About us

Home

Home

“परिस्थितीसमोर हतबल न होता तिला बेधडक सामोरे जाणारी व्यक्तिमत्व,जिद्द, चापल्य, उत्साह, चैतन्य, आणि समाजभान म्हणजे वैशालीताई
एका शेतकरी अशा कुटुंबातील त्यांचा जन्म. पूर्वाश्रमीच्या वैशाली कोते. माहेरहून प्रेम, त्याग, समर्पित वृत्तीचा वारसा हे गुण जरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य घटक असले,तरीही त्यांची स्वतःची बौद्धिक, वैचारिक उंची उल्लेखनीय व अभिमान वाटावा अशी आहे.
जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांची पुण्यभूमी हे त्यांचं सासर… प्रतिष्ठित अशा कोते पाटील घराण्याच्या त्या सून झाल्या… पण, मुळातच जिद्दी आणि स्वतःतील वेगळेपण सिद्ध करणाऱ्या त्यांच्या स्वाभिमानी वृत्तीला जाणीवपूर्वक दुर्लक्षित करणं, आणि पदोपदी अडथळे निर्माण करणं…यातूनच त्यांचा पुढील प्रवास हा संघर्षाच्या दिशेने सुरु झाला.
प्रचंड अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर त्यांनी “स्वतःतील वेगळेपण ” सिद्ध करूनच दाखवलं…!

राहाता येथे अतिशय अद्ययावतअसे सैनिक व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करून ग्रामीण भागातील मुला मुलींना स्वतःचं करियर घडवून देशसेवा करण्याचीही सुवर्णसंधी निर्माण करून दिली आहे..! …आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच एका महिलेने भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करावे…ही विशेष उल्लेखनीय बाब आहे…

वैशालीताई यांच्या अपार जिद्दीला, त्यांच्या संघर्षाला आणि त्यांच्या गरुडभरारीला मनापासून सलाम..

सौ.सोनम यंधे/जाधव BE (computer)

उपाध्यक्ष साईजीत करिअर अकॅडमी

सौ कावेरी विशाल उंडे/आदिक BSC(Maths)

सचिव साईजीत करिअर अकॅडमी

Vishal sir

श्री.विशाल सूर्यभान उंडे MCA(computer

खजिनदार साईजीत करिअर अकॅडमी